Pune : पालखी बंदोबस्तासाठी निघालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचा अपघाती मृत्यू

एमपीसी न्यूज- लष्कर पोलीस ठाण्यात पोलीस नाईक म्हणून कार्यरत असणारे मिलिंद मकासरे हे पालखी बंदोबस्तासाठी दुचाकीवरून फातीमानगरच्या दिशेने निघाले असताना ट्रकच्या धडकेत जागीच ठार झाले. ही घटना आज पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास फातिमानगर येथील क्रोम मॉल चौकाजवळ झाली. या अपघातात ट्रकचे चाक मकासरे यांच्या डोक्यावरून गेल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.