Pune News : गुणरत्न सदावर्ते यांचा ताबा घेण्यासाठी पुणे पोलीस कोल्हापुरात दाखल

एमपीसी न्यूज : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या मुंबईतील निवासस्थानावर हल्ला झाल्यानंतर वकील गुणरत्न सदावर्ते यांना पोलिसांनी अटक केली. मुंबईतील पोलिस कोठडी संपल्यानंतर गुणरत्न सदावर्ते यांना सातारा आणि कोल्हापूर पोलिसांनी वेगवेगळ्या गुन्ह्यात ताब्यात घेतले. गुणरत्न सदावर्ते सध्या कोल्हापूर पोलिसांच्या ताब्यात आहे.  पुण्यात दाखल असलेल्या एका गुन्ह्यात त्यांचा ताबा घेण्यासाठी भारती विद्यापीठ पोलिसांचे एक पथक कोल्हापुरात दाखल झाला आहे. 

सप्टेंबर 2020 छत्रपती शिवाजी महाराजांचा वंशज याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या आरोपावरून गुणरत्न सदावर्ते यांच्याविरोधात पुण्यातील भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचे दोषारोपपत्र दाखल करण्यासाठीचा प्रस्ताव मान्यतेसाठी नुकताच गृहविभागाकडे पाठवण्यात आला होता. त्यानंतर आता पुणे पोलिसांचे एक पथक गुणरत्न सदावर्ते यांचा ताबा घेण्यासाठी कोल्हापुरात दाखल झाला आहे.

त्यामुळे त्याची पोलिस कोठडी संपल्यानंतर पुणे पोलीस केव्हाही त्यांचा ताबा घेऊ शकतात. यामुळे एडवोकेट सुद्धा भरतीचा अडचणीत आणखीनच वाढ होण्याची शक्यता आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.