Pune Police : कोयता दाखवून भाईगिरी करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी दाखवली खाकीची ताकद; नागरिकांनीही केले कौतुक

एमपीसी न्यूज : हल्ली पुण्यामध्ये भाईगिरीचे (Pune Police) प्रकार वाढले आहेत. परंतु, या भाईंचा माज उतरवण्यासाठी पुणे पोलीस देखील कुठेही मागे पडत नाही. त्याचेच उदाहरण म्हणजे आज सिंहगड कॉलेज परिसरात घडलेली घटना. दोन पोलिसांनी एका भाईगिरी करणाऱ्या तरुणाला भर रस्त्यात चोप दिल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. आणि या कामगिरीमुळे नागरिकांमध्ये पोलिसांचे कौतुक होताना दिसत आहे.

वडगाव बुद्रुक आंबेगाव येथे सिंहगड कॉलेजवळ दुकानात कोयता दाखवून काही तरुण दुकानदारांना धमकावत होते. काही तरुणांनी गस्तीवर असणाऱ्या मार्शल पोलिसांना याबाबत माहिती दिली. हि माहिती मिळताच दोन पोलिसांनी हद्दीचा विचार न करता दहशत माजवणाऱ्या गुंडांचा मागोवा घेतला. त्याच्या सोबत असणारे तरुण पळून गेले पण हा तरुण चांगलाच या पोलिसांच्या तावडीत सापडला.

Corona Update : केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ‘या’ सहा देशांतून आलात तर ‘आरटीपीसीआर’ सक्तीची

भर रस्त्यात नागरिकांना दहशत घालणाऱ्या (Pune Police) या तरुणाला नागरिकांसोबतच भर रस्त्यात जीवाची पर्वा न करता केवळ काठीने बेदम चोप दिला. हि कामगिरी करणारे अक्षय इंगवले व धनंजय पाटील या दोन पोलीस कर्मचाऱ्यांनी जीवाची पर्वा न करता त्या आरोपीला ताब्यात घेतले. यामुळे आता सर्वच स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.