Pune : रेशनिंग मिळण्यात येताहेत अडचणी; मनसेचे विभागीय आयुक्त, पुरवठा अधिकारी यांना निवेदन

एमपीसी न्यूज – रेशनिंग मिळण्यात नागरिकांना प्रचंड अडचणी येत आहेत. अनेक रेशनिंग दुकानदारांनी दुकाने बंद ठेवली. काल आणि आज पुन्हा या दुकानांत ज्या कार्डची नोंद आहे. त्यांनाच रेशनिंगवरती धान्य देता येईल, असे सांगत कार्डवर शिक्के मारून आणा, असे सांगत धान्य देण्यास नकार दिला आहे. तर, काही ठिकाणी एका दुकानातून दुसऱ्या दुकानात वर्ग करण्यात आलेल्या कार्डधारकांना रेशनिंगचे धान्य देण्यास संबंधित दुकानदारांनी नकार दिला आहे. हीच अडचण ज्यांनी गेली काही वर्षे रेशनिंगचे धान्यच घेतले नाही त्यांना येत आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री, पुणे विभागीय आयुक्त, पुरवठा अधिकारी यांना मनसेने निवेदन दिले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
HB_POST_END_FTR-A2
You might also like