Pune : गणेश मूर्ती व्रिकेत्यांना वर्गखोल्या मोफत उपलब्ध करून द्या : महापौर

अनाधिकृत स्टॉलवर कारवाई करण्यासही सांगण्यात आले आहे. : Provide free classrooms to Ganesh idol sellers: Mayor

एमपीसी न्यूज – गणेशमूर्ती विक्रेत्या स्टॉलधारकांना पुणे महापालिकेच्या शाळांमधील वर्गखोल्या मूर्ती विक्रीसाठी मोफत उपलब्ध करून देण्याचे आदेश महापौर मुरलीधर मोहोळ यांनी बुधवारी दिले आहेत.

तर, फुटपाथवर आणि रस्त्यांच्या कडेला गणेश मूर्ती विक्री करिता उभारण्यात आलेल्या सर्व अनाधिकृत स्टॉलवर कारवाई करण्यासही सांगण्यात आले आहे.

पुणे शहरात मागील काही दिवसांपासून कोरोनाचे प्रमाण आटोक्यात आले आहे. पॉझिटिव्ह रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.

त्यामुळे आता गणेश मूर्ती खरेदी करण्याकरिता नागरिकांनी गर्दी करू नये, सोशल डिस्टसिंगचे पालन करावे, असे आवाहनही महापौरांनी केला आहे.

जोपर्यंत स्टॉल असेल तोपर्यंत अनामत रक्कम म्हणून पाच हजार रूपये घेण्यात येणार आहे. प्रत्येक गणेश मूर्ती विक्रेत्याला प्रत्येक मूर्ती सह एक किलो अमोनियम बायोकार्बोरेट देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

तर, महापालिकेची मैदाने आणि अ‍ॅमेनिटी स्पेस येथे मंडप उभारणी करून गणेशमूर्ती विक्रीस परवानगी दिली होती.

मात्र, भाडे व डिपॉझिट रक्कम जास्त असल्याने आत्तापर्यंत केवळ दोनच ऑनलाईन अर्ज आले होते. आता महापालिकेने हे भाडे आणि डिपॉझिट कमी केले आहे. दिवसाला असलेले 975 रूपये भाडे 500 रूपये व डिपॉझिटची रक्कम दहा हजार रूपयांवरून पाच हजार रुपये केले आहे

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.