Pune : गणेश विसर्जन मिरवणूक सोहळ्यासाठी पुणे पोलिस सज्ज

एमपीसी न्यूज – पुणे शहरातील गणेश विसर्जन सोहळा ( Pune ) सुरक्षित आणि सुरळीत पार पाडण्यासाठी पुणे पोलीस सज्ज झाले आहे. विसर्जन मिरवणूक वेळेत आणि शांततेत पूर्ण व्हावी यासाठी मंडळांना देण्यात आलेल्या सूचना व नियमांचे कार्यकर्त्यांनी काटेकोर पालन करावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
Pune : भाजपा चे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी घेतले ‘दगडूशेठ’ गणपतीचे दर्शन
पुण्यातील गणेशोत्सव आणि विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी विविध ( Pune )राज्यासह परदेशातून नागरिक मोठ्या संख्येने शहरात येत असतात. लकडी पूल, लक्ष्मी रस्ता, केळकर रस्ता, कुमठेकर रस्ता, टिळक रोड आणि अलका चौकात गर्दी जनसागर लोटलेला असतो. यंदाची मिरवणूक शांततेत व सुरक्षित पार पडावी यासाठी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात केला असून, मिरवणूक वेळेत संपवण्यासाठी पोलिसांचा प्रयत्न असेल.
तसेच सोनसाखळी चोरी आणि महिलांची छेडछाड रोखण्यासाठीदेखील पोलिस पथके तैनात करण्यात आली आहेत. लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांच्या मदतीसाठी 40 पोलिस मदत केंद्र उभारण्यात आली असून संशयितांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी मिरवणूक मार्गांवर 205 सीसीटीव्ही लावण्यात आले ( Pune ) आहेत.
पुणे गणपती विसर्जन मिरवणुकीसाठी कसा असणार पोलिस बंदोबस्त
पोलिस आयुक्त: 1
पोलिस सहआयुक्त: 1
अतिरिक्त पोलिस आयुक्त: 4
पोलिस उपायुक्त: 10
पोलिस निरीक्षक: 155
सहायक निरीक्षक आणि उपनिरीक्षक: 578
पोलिस कर्मचारी: 6 हजार 827
होमगार्ड: 950
राज्य राखीव पोलिस बल तुकडी: 2