Pune news: पुणे रेल्वे विभागाचे वरिष्ठ विभागीय वित्त व्यवस्थापक डॉ. राहुल पाटील यांनी जिंकला हाफ आयर्नमॅनचा किताब

एमपीसी न्यूज : पुणे रेल्वे विभागाचे वरिष्ठ विभागीय वित्त व्यवस्थापक डॉ. राहुल पाटील यांनी रविवार 2 ऑक्टोबर रोजी कोल्हापूर येथे कोल्हापूर स्पोर्ट्स क्लबच्या वतीने आयोजित आयर्नमॅन 70.3 स्पर्धा 7 तास 55 मिनिटांत यशस्वीपणे पूर्ण करून हाफ आयर्न मॅन विजेतेपद जिंकले. स्पर्धा पूर्ण करण्यासाठी दिलेल्या किमान 9 तास 30 मिनिटांच्या तुलनेत त्यांनी हे लक्ष्य सुमारे 8 तासांत पूर्ण केले.
कोल्हापुरात आयोजित हाफ आयर्न मॅन 70.3 स्पर्धा ही जगातील सर्वात कठीण स्पर्धांपैकी एक मानली जाते, ज्यामध्ये 113 किमी अंतर किमान 9 तास 30 मिनिटांत पूर्ण करावे लागते. यात 1.9 किमी पोहणे, 90 किमी सायकलिंग आणि 21.1 किमी धावण्याच्या शर्यतीचा समावेश आहे. या स्पर्धेत 250 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता ज्यात केवळ 140 स्पर्धकांनी स्पर्धा यशस्वीरीत्या पूर्ण केली ज्यामध्ये डॉ. पाटील यांनी स्पर्धेत 84वा तर विशिष्ठ वयोगटात 55वा क्रमांक मिळवला.

डॉ. राहुल पाटील रेल्वे मध्ये उत्कृष्ट कामा साठी वर्ष 2019 मध्ये महाव्यवस्थापक पुरस्कार आणि दक्षता शिल्ड आणि वर्ष 2022 मध्ये प्रधान वित्त सल्लागार पुरस्कार मिळाला आहे. त्यांना क्रिडा आणि फिटनेसची खूप आवड आहे.त्यांनी गेल्या चार वर्षांत विविध सायक्लोथॉन्स ज्यात 50 किमी, 100 किमी आणि 150 किमी सायकलोथॉनचा समावेश आहे आणि 10 हाफ मॅरेथॉन स्पर्धाही यशस्वीपणे पूर्ण केल्या आहेत. हाफ आयर्नमॅन स्पर्धेचे जेतेपद जिंकण्यासाठी त्याने गेल्या ६ महिन्यांपासून कठीण परिश्रम घेतले आहे.
विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्रीमती रेणू शर्मा आणि अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक बृजेश कुमार सिंह यांच्यासह अनेक अधिकारी, कर्मचाऱ्यांनी डॉ. राहुल पाटील यांचे हे विजेतेपद जिंकल्याबद्दल अभिनंदन केले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.