Pune Rain : पुढील दोन दिवसांत अतिवृष्टीचा इशारा; घाट भागात प्रवास टाळा

एमपीसी न्यूज : हवामान विभागाच्या (Pune Rain) अंदाजानुसार 24 जूनपासून पावसाचे आगमन झाले. गेले दोन दिवस पावसाचा वेग कमी होता. परंतु, आजपासून ते 29 जून पर्यंत मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. सातारा, पुणे, नाशिकच्या घाट भागात मुसळधार ते अतिवृष्टी पावसाची शक्यता असल्याने घाटावरील या धोकादायक झोनमध्ये प्रवास टाळण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे. तर पुणे-मुंबई ओलांडणाऱ्यांनी घाटातून वाहन चालवताना खबरदारी घेण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.  

महाराष्ट्रातील सर्वात जास्त पर्जन्य असलेला भाग म्हणजे महाबळेश्वर. या भागात सध्या मुसळधार पाऊस पडत आहे.
25 जून रोजी 107.6 मिमी तर 26 जून रोजी 126 मिमी पाऊस पडला आहे. तर 27-29 जून या कालावधीत पाऊस अधिक जोरदार पडण्याची शक्यता आहे. पुढील 72 तासांत या भागात 450 मिमी पेक्षा जास्त पाऊस अपेक्षित आहे.

IMD-GFS नुसार पुणे शहरासाठी पावसाचा ताजा अंदाज

24 जून: 7-10 मिमी
25 जून: 3-4 मिमी
26 जून: 4-5 मिमी
27 जून: 10-15 मिमी (Pune Rain)
28-29 जून: 20-25 मिमी

Alandi : ‘शासन आपल्या दारी’ अभियान योजनेला आळंदी शहरातून उत्स्फूर्त प्रतिसाद

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.