Pune : राजीव गांधी हेच संगणक-इंटरनेट क्रांती तारणहार : गोपाळ तिवारी

एमपीसी न्यूज – भारताच्या संगणक व इंटरनेट प्रसाराचा पाया राजीव गांधी यांनी घातला हे ‘त्रिवार सत्य’ आहे. देशातील तत्कालीन विरोधी पक्षाचा विरोध झेलत राजीव गांधी यांनी संगणकाचा आग्रह धरल्यामुळेच आज आपण संगणक क्षेत्रात प्रगती करू शकलो. हीच संगणकीय व इंटरनेट प्रणाली ऑनलाईन व्यवहारासाठी “वर्क फ्रॉम होम”साठी कोरोना संक्रमण काळात “लॉक डाऊन” मध्ये तारणहार ठरली आहे, असे प्रतिपादन काँग्रेसचे प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी केले.

कात्रज येथील राजीव गांधी यांच्या पुतळ्यास अभिवादन केल्या नंतर ते बोलत होते. संगणकाला विरोध करताना ज्यांनी संसदेवर बैलगाडी मोर्चा आणला, तेच आज स्वतःला डिजिटल क्रांतीचे प्रणेते म्हणून घेत आहेत, यासारखा दुसरा विनोद नाही असेही त्यांनी नमूद केले.

महिला कॉंग्रेसच्या शहर अध्यक्षा सोनाली मारणे, अभिनव शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष राजीव जगताप, पीएमपीएमएल कामगार संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र खराडे यांनी स्व. राजीवजींच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला.

कॉंग्रेस प्रवक्ते व राजीव गांधी स्मारक समितीचे अध्यक्ष गोपाळ तिवारी यांनी उपस्थितांचे स्वागत केले.

या प्रसंगी सेवादल प्रदेश सरचिटणीस हरिदास अडसूळ, विश्वास दिघे, शिवाजी भोईटे, भोला वांजळे, संजय अभंग, धनंजय भिलारे, शंकर शिर्के, प्रमोद मारणे, विनायक तामकर, नरसिंह अन्दोली, महेश अंबिके, अशोक काळे, उदय लेले, निलेश साळुंके, गणेश कुरे उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.