Pune : भव्य माउंट एव्हरेस्ट समोर स्कायडायव्हिंग करणार शीतल महाजन; जागतिक इतिहासात ठरणार नवा विक्रम

एमपीसी न्यूज : धाडसी आणि अभूतपूर्व वाटचालीसाठी (Pune) तसेच उत्तर-दक्षिण ध्रुवांवर आणि सातही खंडांवर स्कायडायव्हिंगच्या पराक्रमासाठी प्रसिद्ध असलेल्या शितल महाजन एका नव्या आव्हानात्मक मोहिमेला प्रारंभ करत आहेत. या मोहिमेसाठी शीतल यांना रिलायन्सने पाठबळ दिले असून यावेळी शीतल महाजन भव्य माउंट एव्हरेस्ट समोर स्कायडायव्हिंग करणार आहेत. 

ही मोहीम 7 नोव्हेंबर ते 15 नोव्हेंबर 2023 दरम्यान आखण्यात आली आहे. शीतल यांची ही मोहीम केवळ वैयक्तिक पातळीवरील धाडसी कामगिरी नसन जागतिक स्तरावर भारतीय महिलांच्या सक्षमीकरणाचे प्रतीक ठरणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘बेटी की उडान, देश का स्वाभिमान’ या दूरदर्शी घोषणेने प्रेरित होऊन शीतल यांनी ही मोहीम आखली आहे,

शीतल यांनी आपल्या प्रतिक्रियेत म्हंटले आहे, की माऊंट एव्हरेस्ट समोर उड्डाण करणे हे त्यांचे स्वप्न असून त्यांनी  2007 पासून या संधीची तयारी केली आहे. आणि रिलायन्स फाऊंडेशनच्या मदतीने हे स्वप्न प्रत्यक्षात साकारण्यात येणार आहे.

Alandi : भगवान महाराज कोकरे यांच्या उपोषणाची प्रशासकीय पातळीवर दखल

कशी असेल ही मोहीम – Pune

29,035 फूट (8,848 मीटर) उंच असलेल्या जगातील सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्टच्या समोर AS50 B3 हेलिकॉप्टरमधून शीतल उडी मारतील. एव्हरेस्टच्या अगदी खाली 23,000 फुटांवरून ही उडी मारली जाईल. 16,000 ते 18,000 फूट एएमएसएल दरम्यान पॅराशूट ओपनिंग नियोजित  करण्यात आला आहे. लँडिंग साइट्समध्ये हिमालयातील स्यांगबोचे (12,402 फूट) आणि अमादाब्लम बेसकॅम्प (15,000 फूट) यांचा समावेश आहे.

या मोहिमेत जगातील सर्वात उंच शिखरांच्या पार्श्‍वभूमीवर वसलेले केपेरिअन्स आणि डोळ्यांना आनंद देणारी दृश्ये यांचा समावेश आहे. या मोहिमेमध्ये उच्च उंचीवर अनुकूलता, सागरमाथा राष्ट्रीय उद्यानाला भेटी आणि जगातील सर्वोच्च ड्रॉप झोनवर उतरणे यांचा समावेश आहे. ज्यामुळे या साहसाचे वेगळेपण वाढेल.

या मोहिमेद्वारे अनेक जागतिक आणि राष्ट्रीय विक्रम साध्य करण्याचे महाजन यांचे उद्दिष्ट आहे. ज्यामध्ये एका महिलेने सर्वोच्च उंचीवर पॅराशूट उतरवणे आणि उत्तर ध्रुव, दक्षिण ध्रुव आणि माउंट एव्हरेस्ट या तीन ध्रुवांवर स्कायडायव्ह करणारी जगातील पहिली महिला शीतल ठरणार आहे.

एव्हरेस्ट स्कायडाइव्हचा प्रवास 11 दिवसांचा आहे. ज्याची सुरुवात काठमांडू येथे झाली. महाजन यांनी रिलायन्स फाऊंडेशन, भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकार यांचे आभार व्यक्त केले.

ही मोहीम केवळ महाजन यांच्यासाठी वैयक्तिक विजयाचीच नव्हे तर भारतीय महिलांच्या अडथळ्यांना तोडून नवीन उंची गाठण्यातही योगदान देणारी ठरणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.