Pune : शिवसेनेचे शिरूरचे नेते शिवाजीराव आढळराव पाटील अजित पवारांसोबत जाणार ?

एमपीसी न्यूज- लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर (Pune )शिवसेना नेते शिवाजीराव आढळराव पाटील अजित पवार यांच्या सोबत जाणार असल्याची बातमी सोशल मीडियावर व्हायरल झाली होती.यामुळे लोकसभेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे लोकसभे पूर्वी अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे.

येत्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर (Pune )अजित पवारगटाने जागांची चाचपणी सुरु केली आहे . शिरूरची जागा अजित पवार गटाकडे जाणार असून या जागेसाठी आढळराव पाटील यांच्या नावाची चर्चा आहे. या जागेसाठी आढळराव पाटील अजित पवार गटात जाणार असल्याची चर्चा आहे.

Pune :पुण्यात बागेश्वरधाम बाबाच्या कार्यक्रमाचे भाजप कडून आजोजन ;राष्ट्रवादीचा विरोध

शिवसेना उद्धव ठाकरे गटाला सोडून पाटील यांनी शिंदे गटात प्रवेश केला असून लोकसभेसाठी पाटील यांना शिंदे गटाकडून शिरूर मधून लोकसभेसाठी उभे राहायचे आहे. पण ही जागा अजित पवार गटाकडे जात असल्याने आढळराव पाटील राष्ट्रवादी अजित पवार गटात जाणार असल्याची चर्चा आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.