Pune : धक्कादायक ! शहरात आज कोरोना रुग्ण वाढले; 153 पॉझिटीव्ह, 4 मृत्यू

एमपीसी न्यूज : कोरोना संसर्गजन्य रोगाचे रुग्ण आज, शनिवारी एकदम वाढले. दिवसभरात नव्या रुग्णांची संख्या 135 झाली. त्यामुळे पुणेकरांच्या चिंतेत भर पडली. तर कोरोनाबाधित 4 रुग्ण दगावले. काल ( शुक्रवारी) 12 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला होता.  त्यामानाने आज मृत्यूचे प्रमाण घटले.

शहरात आज दिवसभरात 96 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. सध्या 70  क्रिटिकल रुग्णांवर उपचार चालू असून 12  रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत.

पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रुग्ण संख्या 2,380 असून अॅक्टिव्ह रुग्ण संख्या 1,414  आहे. कोरोनाबाधित मृतांची संख्या 140 झाली आहे.

शहरात 1,543 स्वॅब नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे.

ससून रुग्णालयातील आजचा वैद्यकीय अहवाल

आजची सॅम्पल तपासणी : 296

पॉझिटिव्ह रुग्ण : 9

आजचे मृत्यू : 3

आजपर्यंतचे एकूण मृत्यू : 86

आजचे एकूण डिस्चार्ज : 10

आजपर्यंत डिस्चार्ज झालेले रुग्ण : 74

आज स्क्रीनिंग केलेले रुग्ण : 98

आजचे संशयित रुग्ण : 86

आज तपासलेले स्वाब : 86

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.