Pune : व्हेंटिलेटर, ऑक्सिजन व इतर सुविधा तातडीने सुरू करा : महापालिकेतील विरोधी पक्षांची मागणी

Start ventilator, oxygen and other facilities immediately: Demand of the Opposition in the Municipal Corporation

एमपीसी न्यूज – महापालिकेतर्फे उभारलेल्या रुग्णालयातील अनेक जागा विनावापर पडून आहेत. या जागांवर अथवा बंद केलेल्या ओपीडीच्या ठिकाणी तातडीने व्हेंटिलेटर, ऑक्सिजन व इतर सेवा आवश्यक सुविधा सुसज्जपणे त्वरित चालू कराव्यात, अशी मागणी विरोधी पक्षनेत्या दीपाली प्रदीप धुमाळ, शिवसेनेचे गटनेते पृथ्वीराज सुतार, मनसेचे गटनेते वसंत मोरे आणि काँग्रेसचे गटनेते आबा बागुल यांनी केली आहे.

पुणे शहरात निवृत्त शास्त्रज्ञ डॉ. पी. लक्ष्मी नरसिंह यांना व्हेंटिलेटर न उपलब्ध झाल्याने त्यांचा ससून रुग्णालयात मृत्यू झाला, ही घटना दुर्दैवी आहे.

महापालिकेकडे करोडो रुपयांचा निधी उपलब्ध असताना व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजन याची उपलब्धता नाही ही गंभीर बाब आहे, अशा स्पष्ट शब्दांत राष्ट्रवादी, शिवसेना, मनसे आणि काँग्रेसने नाराजी व्यक्त केली आहे.

कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढतच आहे. रुग्णांची संख्या 30 हजारांहून जास्त झाली आहे. भविष्यात ही संख्या एक लाखाच्या घरात किंवा त्यापेक्षा जास्त होईल, असा अंदाज आहे.

कोरोनामुळे बेडसाठी महापालिकेतर्फे खाजगी रुग्णालयांबरोबर करार केले आहेत. सद्यस्थितीत त्याठिकाणी उपचारासाठी गेल्यावर जागा शिल्लक नसल्याचे सांगितले जात आहे.

डॉक्टर्स, नर्स आणि इतर स्टाफ यांची भरती करण्यासाठी विलंब लावल्याने अद्यापही सुविधा उभारता आलेल्या नाहीत, ही वस्तुस्थिती आहे.

त्यासंदर्भात प्रशासनाला पत्र दिले असताना कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही. पुणे शहरातील एका रुग्णाचा उपचारविना मृत्यू झाल्यास सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, असेही पत्र दिलेले आहे.

त्यावर प्रशासनाने काय कारवाई केली याची तातडीने माहिती द्यावी, अशीही मागणीही आयुक्तांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.