_MPC_DIR_MPU_III -NEW PUN  21 JUN 2021

Pune : पुण्यात सलग दुसऱ्या दिवशी कडक लॉकडाऊन

Strict lockdown for second day in a row in Pune; मंडईसह मुख्य रस्त्यांवर शुकशुकाट

एमपीसी न्यूज – महापालिका प्रशासनातर्फे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनला पुणेकरांनी स्वतःहून चांगला प्रतिसाद दिला आहे.  बुधवारी दुसऱ्या दिवशी कडक लॉकडाऊन पाळण्यात आला.

महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी 10 दिवसांचा कडक लॉकडाऊन जाहीर केला आहे. त्यामुळे मंडई, लक्ष्मी रोड, बेलबाग चौक, बाजीराव रोड, टिळक रोड, अलका टॉकीज चौक, शनिवारवाडा, जंगली महाराज रोड, फर्ग्युसन रोडवर प्रचंड शुकशुकाट आहे.

उपनगरांतही लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्यात येत आहे. बिबवेवाडी परिसरात काही ठिकाणी नागरिक रस्त्यांवर आले होते. त्यांना ‘गांधीगिरी’ पध्दतीने पुष्प देऊन घरीच राहण्याचा सल्ला देण्यात आला.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी जागोजागी रस्त्यांवर बॅरिकेड लावले आहेत. शहराच्या मध्यवर्ती भागांतील रस्त्यांवर पत्रे लावून बंद करण्यात आली आहेत.

पुणे शहरात कोरोनाचे 29 हजार रुग्ण झाले आहेत. तर, 18 हजार 825 नागरिकांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी हे लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. या लॉकडाऊनमुळे व्यापाऱ्यांचे नुकसान होत असल्याचे सांगण्यात आले.

त्यामुळे 10 दिवसांपेक्षा जास्त लॉकडाऊन सहन करणार नसल्याचा इशाराही व्यापाऱ्यांनी दिला आहे. लॉकडाऊनच्या या कालावधीत जास्तीत जास्त कोरोना टेस्ट करण्यावर प्रशासनाचा जोर आहे.

वैद्यकीय सुविधा सक्षम करण्यावर भर देण्यात येत आहे. कोरोनाची लक्षणे आढळून आल्यास तातडीने तपासणी करण्याचे आवाहन पुणे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.