Pune: विषारी औषध पिऊन इसमाची आत्महत्या

एमपीसी न्यूज – धायरी येथील एका इसमाने एका महिला आणि पुरुषाच्या सततच्या पैशाच्या मागणीला कंटाळून विषारी औषध पिऊन आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी (दि.25) रात्री पावणे नऊच्या सुमारास खंडोबा मंदिराकडे जाणा-या रोड लगत असलेल्या पाण्याच्या टाकीजवळ घडली.

यशवंत हरीभाऊ पवार (वय 54, रा. धायरी) असे आत्महत्या केलेल्या इसमाचे नाव आहे. याप्रकरणी एक पुरूष आणि एका महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत इसमाने आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठी लिहिली होती. यातील मजकुरानुसार पवार यांना नारायण पेठ येथील एक पुरुष व महिला सतत पैशांची मागणी करीत होते. या त्यांच्या सततच्या पैशाच्या मागणीला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे नमूद केले आहे.

त्यानुसार ही महिला आणि पुरुष यांच्यावर आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले असल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.