Pune : येरवडा मध्यवर्ती कारागृहातील बंदिवानांसाठी ‘तणावमुक्ती’चे व्याख्यान संपन्न

एमपीसी न्यूज – येरवडा मध्यवर्ती कारागृहातील (Pune) बंदिवानांच्या ‘तणावमुक्ती’साठी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन अपर पोलीस महासंचालक व राज्याचे कारागृह व सुधार सेवा महानिरीक्षक अमिताभ गुप्ता यांच्या संकल्पनेतून व पश्चिम विभागाच्या कारागृह उपमहानिरीक्षक स्वाती साठे यांच्या मार्गदर्शनाखाली स्ट्रेस रिलीज फाऊंडेशनच्या वतीने करण्यात आले.

कार्यक्रमास अपर पोलीस महासंचालक अमिताभ गुप्ता, कारागृह उपमहानिरीक्षक स्वाती साठे, कारागृह अधीक्षक राणी भोसले, कारागृह उपअधीक्षक शिवशंकर पाटील, स्ट्रेस रिलीज फाऊंडेशनचे अध्यक्ष व प्रमुख वक्ते अशोक देशमुख उपस्थित होते.

यावेळी अशोक देशमुख यांनी तणावमुक्ती या विषयावरील व्याख्यानात शारीरिक व मानसिक ताण-तणाव दूर करण्यासाठी दररोज हलका व्यायाम व योगासन करण्याचे महत्त्व बंद्यांना पटवून देऊन विविध शारीरिक वेदना व व्याधींवर हलक्या व्यायाम प्रकारांचे प्रशिक्षण दिले. दैनंदिन जीवनात आनंदी राहणे व हसणे याचे अनन्यसाधारण महत्त्व असल्याचे त्यांनी सांगितले.

Pimpri : गोव्याचे माजी मुख्यमंत्री रमाकांत खलप आणि शालिनी खलप यांना यशवंत वेणू पुरस्कार जाहीर

दोन सत्रात संपन्न झालेल्या या व्याख्यानमालेत सुमारे 300 बंद्यांनी (Pune) सहभाग नोंदवला. कार्यक्रमाच्या समारोपात काही बंद्यांनी सकारात्मक भावना व्यक्त केल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.