Pune : विभागात 896 कोरोनाबाधित, 61 मृत्यू , तर 135 रुग्ण कोरोनामुक्त – डॉ.दीपक म्हैसेकर

एमपीसी न्यूज – पुणे विभागातील कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 896 झाली असून, विभागात 135 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. सध्या विभागात 700 ॲक्टीव रुग्ण असून, एकूण 61 कोरोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 12 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.

पुणे विभागात 896 बाधित रुग्ण असून 61 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यापैकी पुणे जिल्हयात 813 रुग्ण असून 55 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सातारा जिल्हयात 16 बाधीत रुग्ण असून 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सोलापूर जिल्हयात 30 बाधीत रुग्ण आहेत. तर 3 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सांगली जिल्हयात 27 बाधीत रुग्ण असून एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. कोल्हापूर जिल्हयात 10 बाधीत रुग्ण आहेत.

आजपर्यत विभागामध्ये एकूण 10 हजार 717 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी 10 हजार 210 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला. असून, 507 नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 9 हजार 264 नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह, तर 896 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

आजपर्यंत विभागामधील 45 लाख 86 हजार 612 घरांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले. त्याअंतर्गत 1 कोटी 76 लाख 36 हजार 673 व्यक्तींची तपासणी केली आहे. त्यापैकी 865 व्यक्तींना अधिक तपासणीसाठी संदर्भीत करण्यात आले असल्याची माहिती डॉ. म्हैसेकर यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.