Pune : सोन्यापेक्षा चांदीच्या भावात 1 हजार रुपयांची घसरण

एमपीसी न्यूज : पुण्यात आज सोन्याचा भाव 360 रुपयांनी (Pune) कमी झाला असून आज 24 कॅरेटच्या 10 ग्रॅम सोन्याचा भाव  62 हजार 100 एवढा आहे. काल हाच भाव 62 हजार 460 एवढा होता. तर, चांदीच्या भावात 1 हजार रुपयांची घसरण झाली आहे. आज एक किलो चांदीचा भाव 77 हजार असून याच चांदीची किंमत 78 हजार होती.  

 

आज, 23 कॅरेट सोन्याचा भाव 60 हजार 230 एवढा असून यामध्येही साडेतीनशे रुपयांची घट झाली आहे. काल 23 कॅरेट सोन्याचा भाव 60 हजार 580 एवढा होता.

Pune : चांदणी चौक पुलाच्या कामातील घाईमुळे नागरिकांच्या जीवाशी होतोय का खेळ?

 

तसेच, 22 कॅरेट सोन्याचा भाव 57 हजार 510 रुपये (Pune) असून यामध्येही 330 रुपयांची घट झाली आहे. काल 22 कॅरेट सोन्याचा भाव 57 हजार 840 एवढा होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.