Pune : जे.पी.नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली 18 मे रोजी होणार राज्य कार्यकारिणीची बैठक

एमपीसी न्यूज : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्या (Pune) अध्यक्षतेखाली पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात 18 मे रोजी राज्य कार्यकारिणीची बैठक होणार आहे. अशी माहिती भाजप शहराध्यक्ष माजी आमदार जगदीश मुळीक यांनी दिली.

यावेळी जगदीश मुळीक म्हणाले की, पुण्यात 2015 मध्ये राज्य कार्यकारिणीची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर यंदा पुण्यात राज्य कार्यकारिणीची बैठक बालगंधर्व रंगमंदिरात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी 10 ते 5 यावेळेत होणार आहे.

Nigdi : हातगाडी, स्टॉल धारकांचे कृष्णानगर चौकात बेमुदत आंदोलन

या (Pune) बैठकीला प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह राज्यातील खासदार,आमदार आणि पदाधिकारी या बैठकीला 1200 च्या आसपास ही संख्या असणार आहे. बालगंधर्व येथील बैठक 5 वाजता झाल्यानंतर साडे पाच वाजता राज्यातील खासदार आणि आमदार यांची घोले रोड येथील पंडित जवाहरलाल नेहरू आर्ट गॅलरी येथे बैठक आयोजित करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.