Pune : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मारून टाकण्याची धमकी ; आरोपीला पुणे पोलिसांनी घेतले ताब्यात

सोमवारी रात्री डायल 112 वर फोन करून दिली धमकी.

एमपीसी न्यूज – राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना (Pune) उडवणार आहे, असा धमकीचा कॉल आल्याने पुण्यात एकच खळबळ उडाली. आरोपीने सोमवारी (10 एप्रिल) रात्री 112 या हेल्पलाईनवर फोन करून धमकी दिली. “मी एकनाथ शिंदे यांना उडवणार आहे” असे आरोपी म्हणाला आणि त्याने फोन बंद केला. पोलिसांनी तत्काळ तपासाची चक्रे फिरवून आरोपीला ताब्यात घेतले. राजेश मारूती आगवने (वय 43) असे आरोपीचे नाव आहे. राजेश हा मुंबईतील धारावी परिसरात राहतो.मुंबईत च वॉर्ड बॉय म्हणून काम करतो.

Pimpri News : पिंपरी विधानसभा क्षेत्रात निघाली  वीर सावरकरांची भव्य गौरव यात्रा; नागरिकांकडून पुष्पवृष्टीद्वारे  स्वागत

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,धमकीचा कॉल पुणे शहरातील वारजे परिसरातून आल्याचे समोर आले. राजेशची पत्नी कोथरुडला खाजगी ठिकाणी काम करते. तिला भेटायला तो महिन्यातून दोन वेळा येतो. 2 वर्षांपूर्वी त्यांचा प्रेमविवाह झालेला असून मुलबाळ नाही. तो दारूच्या नशेत कोणालाही शिवीगाळ करतो असे त्याची पत्नी व ओळखीचे लोक फोन केल्यावर सांगत आहेत.

काल रात्री प्रथम त्याने 112  वर call करून छातीत दुखतंय रुग्णवाहिका पाठवा असे कळविले होते. त्यासाठी नियंत्रण कक्षातून 108 ला कळवा असे सांगितल्यावर त्याने दुसऱ्यांदा त्याच नंबर वरून त्याने माननीय मुख्यमंत्री महोदयांना धमकी देण्याचा कॉल केला. त्याची माहिती घेऊन पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले त्यावेळी तो दारुच्या नशेत असल्याचे (Pune)निष्पन्न झाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.