Pune : नववर्षाच्या पूर्वसंध्येला शहरातील वाहतूक सिग्नल रात्रभर चालू राहणार

एमपीसी न्यूज- नववर्षाच्या स्वागतासाठी शहरातील नागरिक रात्रभर जागे असतात. शहरातील वाहतूक देखील रात्रभर चालू असते. त्या अनुषंगाने पुणे शहरातील प्रमुख 22 चौकांमधील वाहतूक सिग्नल रात्रभर चालू राहणार आहेत. 31 डिसेंबरच्या संध्याकाळपासून 1 जानेवारीच्या पहाटेपर्यंत सिग्नल यंत्रणा चालू ठेवण्याबाबतचे पत्र वाहतूक पोलिसांनी पुणे महापालिकेला दिले आहे.

गतवर्षाला निरोप देण्यासाठी व नववर्षाच्या स्वागतासाठी शहरात विविध ठिकाणी कार्यक्रम साजरे केले जातात. नागरिक देखील सहकुटुंब फिरायला बाहेर पडतात. या वेळी मोठ्या प्रमाणात वाहने रस्त्यावर येत असल्यामुळे काही भागात वाहतूक कोंडी झालेली पाहायला मिळते. दररोज रात्री 12 ते सकाळी 7 वाजेपर्यंत सिग्नल यंत्रणा बंद ठेवण्यात येते. मात्र नववर्ष स्वागतासाठी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहने येऊ शकतात. त्या अनुषंगाने 1 जानेवारी रोजी पहाटे 5 वाजेपर्यंत सिग्नल यंत्रणा चालू ठेवण्यात यावी असे पत्र पोलिसांनी पुणे महापालिकेला दिले आहे. नागरिकांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.

_MPC_DIR_MPU_II

या चौकातील सिग्नल यंत्रणा रात्रभर चालू राहणार

पुणे विद्यापीठ चौक, नळस्टॉप चौक, टिळक चौक, अलका चौक, पुरम चौक, मार्केटयार्ड चौक, सिंहगड जंक्शन, एबीसी फार्म, गोल्फ क्लब चौक, बोपोडी चौक, खंडुजीबाबा चौक, सिमला ऑफिस चौक, शाहीर अमर शेख चौक, जेधे चौक, ज्ञानेश्वर पादुका चौक, राजाराम पूल चौक, शास्त्रीनगर चौक, सॅडलबाबा चौक, गुडलक चौक, झाशीची राणी चौक, जहांगीर चौक

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1