रविवार, सप्टेंबर 25, 2022

Pune news : आदर्श विद्यार्थी घडविण्यात गृहपालांची भूमिका महत्त्वाची- डॉ. प्रशांत नारनवरे

एमपीसी न्यूज : शासकीय वसतीगृहातील आदर्श विद्यार्थी घडविण्यात गृहपालांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून त्यांनी पालकत्व या नात्याने जबाबदारी घेतल्यास निश्चितच समाजात आदर्श विद्यार्थी निर्माण होतील,(Pune news) असे मत राज्याचे समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी व्यक्त केले.

उत्कृष्ट काम करणाऱ्या गृहपालांचे दोन दिवसाचे प्रशिक्षण अल्पबचत भवन, पुणे येथे आयोजित करण्यात आले होते. प्रशिक्षणाचे उद्घाटन प्रसंगी डॉ. नारनवरे बोलत होते. कार्यक्रमाला बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये, सहआयुक्त भारत केंद्रे, उपायुक्त विजय गायकवाड, उमेश सोनवणे, मनिषा फुले, निशा देवी बंडगर आदी उपस्थित होते.

डॉ.नारनवरे म्हणाले, समाजातील पालक मोठ्या अपेक्षेने त्यांच्या पाल्यांना शासकीय वसतीगृहात पाठवत असतात. त्यामुळे त्यांच्या सर्वांगीण विकासाबरोबरच त्यांच्यात आदर्श विद्यार्थी निर्माण कसे होतील यासाठी देखील गृहपालांनी सतत प्रयत्नशील असणे गरजेचे आहे.

Wine sale in super market : सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीबाबत अभ्यासाअंतीच निर्णय

समाज कल्याण आयुक्तालय पुणे व डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे यांचे संयुक्त विद्यमाने पुणे येथे 22 व 23 सप्टेंबर रोजी दोन दिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात होते. या प्रशिक्षणात राज्यातील सहभागी गृहपाल यांना यावेळी आयुक्त डॉ.प्रशांत नारनवरे यांच्या हस्ते गौरवण्यात आले.(Pune news) दोन दिवस चाललेल्या प्रशिक्षण कार्यक्रमात गृहपालांना नाविन्यपूर्ण उपक्रमांचे तसेच विद्यार्थी उपयोगी विविध उपक्रमांबाबात तज्ज्ञ मान्यवरांनी मार्गदर्शन केले. यावेळी राज्यातील सर्व गृहपाल यांनी आयुक्त यांनी राबवलेल्या या नावीन्यपूर्ण संकल्पनेचे स्वागत केल्या असून शासनाला धन्यवाद दिले आहेत. कार्यक्रमाला समाज कल्याण आयुक्तालयचे तसेच बार्टीचे अधिकारी व कर्मचारी व राज्यभरातील शासकीय वसतीगृहाचे गृहपाल उपस्थित होते.

 

 

spot_img
Latest news
Related news