Pune : शहरातील दोन हजार रस्त्यांचे टप्याटप्याने रुंदीकरण होणार : महापौर

Two thousand roads in the city will be widened in phases: Mayor

एमपीसी न्यूज – पुणे शहरातील दोन हजार रस्त्यांचे टप्याटप्याने रुंदीकरण करण्यात येणार आहे. त्यामध्ये बजेटची काहीही अडचण येणार नसल्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

टीडीआर, एफएसआय वाढविण्यात येणार आहे. 30 ते 40 वर्षे इमारतींचा विकास थांबला होता, तो आता होणार आहे. सातत्याने या विषयाचा पाठपुरावा सुरू होता.

आमदार चंद्रकांत पाटील यांनीही पाठपुरावा केल्याचे महापौरांनी सांगितले. यावेळी उपमहापौर सरस्वती शेंडगे, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, सभागृह नेते धीरज घाटे उपस्थित होते.

पुणे शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वच रस्ते 9 मीटर करण्याचा प्रस्ताव आम्ही मान्य केला. मात्र, विरोधक केवळ राजकीय विरोध करीत असल्याची टीका स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी केली.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दादागिरीच्या त्या विषयाला सुद्धा आम्ही विरोध करीत आहोत. पुणे शहराचा विकास आम्हाला सर्वांना बरोबर घेऊन करायचा आहे. सर्व रस्त्यांवर हरकती – सूचना मागविणार आहोत.

गटनेत्यांच्या बैठकीत सर्वच रस्ते करणार असल्याचे सांगितले होते. त्यांच्या विनंतीला मान्य करून एका आठवड्यासाठी रस्त्यांचा विषय पुढे घेतला. मात्र, तरीही विरोधी पक्षांनी विरोध केला.

विकासासाठी रस्ते मोठे करणे आवश्यक आहे. 9 मीटर रस्ता केल्याने टीडीआर वापरता येणार आहे. हे महापालिका नियम 210 अन्वये करावे लागणार असल्याचे रासने यांनी निक्षून सांगितले.

विकास करण्यासाठी हा प्रस्ताव मंजूर केला आहे. दरम्यान, 323 रस्ते रुंद करण्याचा विषय भाजपने अतिशय प्रतिष्ठेचा केला होता. त्याला मंगळवारी बहुमताने मान्यता देण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.