Pune News : गायन  वादन आणि नृत्याने  रंगला ऊर्जा संगीत महोत्सव

एमपीसी न्यूज – पेशकार, कायदा, रेला, तुकडे, मिश्र जाती कायदा तुकडे, मुखडे, चक्रदार, तीनताल, झपतालातील पारंपरिक बंदीशी अशा उत्कंठावर्धक सामूहिक तबलावादनाने (Pune News) संजोग तबला विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ऊर्जा संगीत महोत्सवाची दमदार सुरवात केली. 

पुण्यातील प्रसिद्ध तबला वादक शंकर कुचेकर यांच्या विद्यालया तर्फे घोले रस्त्यावरील पं. जवाहरलाल नेहरू सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या ‘ऊर्जा’ या  गायन वादन आणि नृत्याचा त्रिवेणी संगम असलेल्या संगीत मैफलीला रसिकांनी भरभरून दाद दिली.

कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रात संजोग तबला विद्यालयच्या विद्यार्थ्यांनी गुरुवंदना सादर केली यामधे गुरूर ब्रम्हा गुरुर विष्णु… हा  श्लोक आदी चोरडिया याने गायला.(Pune News) त्याला रिया भवसार, आर्यन आकोलकर शिव कुचेकर, शिव चोरडिया आणि  सचिन पालेशा यांनी तबल्यावर साथ केली. त्यानंतर आदिरा गोयल व  नीव लोढा यांनी तीनताल आणि  झपताल मधे ऐकल वादन केले.

Chinchwad News : महापालिका शनिवारी पेन्शनर्स डे साजरा करणार  

शिव आणि आदि चोरडिया बंधूंच्या तबला जुगलबंदी ने रसिकांची वाहवा मिळवली. प्लेलॉजी संस्थेच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सामूहिक तबला वादना नंतर भुल भुल्लैया चित्रपटातील मेरे ढोलना सुन मेरे प्यार की धून.. या गाण्या वर स्वतः शंकर कुचेकर, शिव चोरडिया आणि आदी चोरडिया यांनी सामूहिक तबला वादन करून पहिल्या सत्राची सांगता केली.

कत्थक गुरु अपर्णा पाटेदार यांच्या नृत्यांजली कथक कला केंद्राच्या विद्यार्थिनींनी गणेशवंदना आणि ताराण्याने  तिसऱ्या सत्राची सुरवात केली. कत्थक नृत्यांगना वर्षा पिरंगुटे आणि हर्षदा शिंदे यांनी बहारदार युगल नृत्य करून प्रेक्षकांची दाद  मिळवली. त्यांनी ताल, तोडे, परण, गिनती, चक्कर सादर केल्या. वर्षा पिरंगुटे यांनी ब्रिजभूमीत रंगलेला कृष्ण गोपिकांचा होळीचा सण ‘होरी’ मधून सादर केला तसेच त्यांचे नृत्य आणि  शंकर कुचेकर यांचे तबला वादन अशा तबला आणि घुंगरू यांच्यातल्या जुगलबंदीने रसिकांना मंत्रमुग्ध केले.

त्यानंतर गुरु रेश्मा गोडांबे यांच्या शिष्यांनी  शिवपंचाक्षर स्तोत्रावर आधारित कथक नृत्य सादर केले. कत्थक गुरु मुल्ला अफसर खान यांच्या  शिष्यांनी पं. अविनाश बेलसरे (Pune News) यांनी संगीतबद्ध केलेल्या सूरदास रचित दशावतार भजनातील  दहा अवतार नृत्य आणि उत्कृष्ठ अभिनयातून सादर करून कार्यक्रमाची सांगता केली. कार्यक्रमात शंकर कुचेकर – तबला,  सुधीर टेकाळे – संवादिनी, अक्षय जाधव – गिटार यांनी साथसंगत केली. अनिल लाडिया यांनी निवेदन केले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.