Pune : उजनीच्या पाणस्थळांवर फ्लेमिंगो, अडकीत्या, कुदळ्यासह विविध पक्षी भक्ष्यांवर मारताहेत ताव

एमपीसी न्यूज – उजनी धरणाच्या बॅकवॉटर परिसरात विविध (Pune) देशी, विदेशी पक्ष्यांची किलबिल सुरु आहे. फ्लेमिंगो, अडकित्या, कुदळ्यासह विविध पक्षी पाणस्थळांवर भक्ष्याच्या शोधात हिंडत आहेत. इथल्या दलदलीत हे पक्षी आपल्या भक्ष्यावर ताव मारत आहेत.

उजनी धरणाच्या बॅकवॉटर परिसरातील काळेवाडी, डाळज, कुंभारगाव या भागात फ्लेमिंगो (रोहित), अडकित्या, कुदळ्या, चमचा, राखी बगळा, सुरई, तुतवार, पणकावळे अशा पक्ष्यांचे थवे आढळून येत आहेत. उजनी धरण सोलापूरची तहान भागवणारे धरण आहे. उन्हाळा सुरु असून धरणातून सोलापूरसाठी आवर्तन सुरु आहे. त्यामुळे बॅकवॉटर परिसरात पाणी पातळी झपाट्याने कमी होत आहे.

Punawale : काम देण्याच्या बहाण्याने महिलेची 24 लाखांची ऑनलाईन फसवणूक

परिणामी पाणस्थळाच्या ठिकाणी पक्ष्यांना मुबलक खाद्यही मिळत (Pune) आहे. मासे, खेकडे असे मुबलक खाद्य मिळत असल्याने पक्ष्यांचे थवेच्या थवे खांद्यावर ताव मारत आहेत.

मागील काही दिवसात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. पावसाचा तडाखा सहन करूनही हे पक्षी अजूनही बॅकवॉटर परिसरात तळ ठोकून आहेत. या पक्ष्यांना पाहण्यासाठी अनेक पर्यटक उजनीच्या बॅकवॉटर परिसरात येत असतात. या पर्यटकांना देशी, विदेशी पक्षी दलदलीत भक्ष्यांवर ताव मारताना दिसत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.