Punawale : काम देण्याच्या बहाण्याने महिलेची 24 लाखांची ऑनलाईन फसवणूक

एमपीसी न्यूज – महिलेला काम देतो, असे आमिष दाखवून अनोळखी व्यक्तीने लिंकद्वारे अधिक पैसे मिळतील असे सांगितले. (Punawale) त्यासाठी महिलेकडून वेगवेगळ्या कारणांसाठी 24 लाख 38 हजार रुपये घेत फसवणूक केली. हा प्रकार 2 ते 5 मे या कालावधीत काटे वस्ती, पुनावळे येथे घडला.

याप्रकरणी 30 वर्षीय महिलेने रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Maharashtra : राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचा आढावा; गडकरी, शिंदे-फडणवीस यांची बैठक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेला व्हाटसअप वर अनोळखी व्यक्तीने संपर्क केला. फिर्यादीला काम देतो, असे सांगून विश्वास संपादन केला. (Punawale) फिर्यादीला वेळोवेळी लिंक पाठवून अधिक पैसे, बोनस देण्याचे आमिष दाखवले. त्यापोटी फिर्यादीकडून वेगवेगळ्या बँक खात्यांत 24 लाख 38 हजार 70 रुपये घेतले. त्यानंतर फिर्यादीला कोणताही नफा अथवा काम न देता त्यांची फसवणूक केली. रावेत पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.