Pune : गुरुवारी पुण्यातील काही भागात पाणीपुरवठा बंद

एमपीसी न्यूज –  येत्या गुरुवारी (26 ऑक्टोबर) वारजे ( Pune) जलशुद्धीकरण केंद्राअंतर्गत एसएनडीटी आणि चतु:श्रृंगी, तळजाई, लष्कर जलशुद्धीकरण केंद्राकडे जाणाऱ्या जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे गुरुवारी काही भागाचा पाणीपुरवठा बंद राहणार असून दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी (27 ऑक्टोबर) सकाळी उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याचे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून कळविण्यात आले आहे.

Pimpri : श्री संदीप वाघेरे युवा मंचच्या वतीने भव्य रावण दहन कार्यक्रमाचे आयोजन

या परिसरात असेल  पाणीपुरवठा बंद

वारजे जलशुद्धीकरण केंद्र, चतुःशृंगी टाकी, पुणे कॅन्टोन्मेंट जलशुद्धीकरण केंद्र येथे ( Pune) देखभाल दुरुस्तीची कामे होणार आहेत. त्यामुळे तळजाई विभागातही पाणीपुरवठा बंद राहणार आहे. कोथरूड, कर्वेनगर, वारजे, शिवणे, भुसारी कॉलनी, शिवतीर्थनगर, सेनापती बापट रस्ता, मॉडेल कॉलनी,

डेक्कन, पुलाची वाडी, शिवाजीनगरचा परिसर, औंध, बाणेर, नगर रस्ता, खराडी गावठाण, चंदननगर, हडपसर, मुंढवा, महंमदवाडी, ससाणेनगर, काळेपडळ, येरवडा, बिबवेवाडी, बालाजीनगर, इंदिरानगर, तळजाई परिसर, कात्रजचा काही भाग आदींचा पाणीपुरवठा बंद राहणार असल्याचे महापालिकेने ( Pune) कळविले आहे.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.