Pune : राज्य शासनाचा आदेश प्राप्त झाल्यानंतर बोलणार : हेमंत रासने

Will speak after receiving the order of the state government: Hemant Rasane

एमपीसी न्यूज – राज्य शासनाने आज, मंगळवारी पुणे शहरातील 323 रस्त्यांच्या रुंदीकरणाला स्थगिती दिली. त्यावर अजून राज्य शासनाचा आदेश प्राप्त झाला नाही. मुंबईतील बैठकीत काय झाले, याची मला काहीही माहिती नाही. शासनाचा आदेश प्राप्त झाल्यानंतर, त्यामध्ये काय काय म्हटले, याचा अभ्यास करून प्रतिक्रिया देणार, अशी माहिती स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी दिली.

पुणे महापालिका प्रशासनातर्फे शहरातील 323 रस्त्यांच्या रुंदीकरणाबाबत डॉकेट ठेवण्यात आले होते. त्यानुसार शहरातील सर्वच रस्ते 6 मीटरचे 9 मीटर करण्याचा विषय स्थायी समितीने बहुमताने मंजूर केला होता. या प्रस्तावावर हरकती आणि सूचना मागविण्यास आम्ही मान्यता दिली होती.

_MPC_DIR_MPU_II

यासंदर्भात राज्य शासनाने नेमका काय निर्णय घेतला याची मला काहीही माहिती नाही. याबाबतच आदेश प्राप्त झाल्यानंतर त्यावर बोलणार असल्याचे रासने म्हणाले.

दरम्यान, पुणे शहराच्या विकासासाठी रस्ते रुंदीकरणाला भाजपने मंजुरी दिली होती. त्याला काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, मनसे या राजकीय पक्षांनी विरोध केला आहे.

आज मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत रस्ते रुंदीकरणाला स्थगिती देण्यात आली. त्यामुळे आगामी काळात पुणे महापालिका विरुद्ध राज्य शासन असा सामना रंगण्याची चिन्हे आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.