Pune : स्थायी समिती सदस्य पदासाठीही एक वर्ष कालावधी होणार का?

एमपीसी न्यूज – येत्या 17 फेब्रुवारीला सर्वसाधारण सभेत स्थायी समिती सदस्यांची निवड करण्यात येणार आहे. महापौर, उपमहापौरांचा कालावधी ज्याप्रमाणे एक वर्ष करण्यात आला. त्याचप्रमाणे स्थायी समिती सदस्यांचाही कालावधी असावा, अशी मागणी करण्यात येत आहे. त्यामुळे अनेक नगरसेवकांना संधी मिळू शकते.

2019 च्या विधानसभा निवडणुकीत हडपसर आणि वडगावशेरी मतदारसंघात धक्कादायकरित्या पराभव झाल्यानंतर भाजपने तातडीने पदाधिकारी बदलले. भाजपच्याच काही नगरसेवकांनी विरोधात काम केल्याचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना सांगण्यात आले आहे. पाटील यांनीही ती भावना बोलून दाखविली.

सुरुवातीपासून सत्तेचा ‘पिंपरी – चिंचवड’ पॅटर्न’ राबविण्याची गरज होती. आता महापालिका निवडणुकीला केवळ 2 वर्षांचा कालावधी बाकी आहे. आगामी निवडणूक वॉर्ड पध्दतीने होणार असल्याने महाविकास आघाडीचे भाजपपुढे आव्हान आहे.

2017 च्या महापालिका निवडणुकीत भाजपचे तब्बल 98 नगरसेवक निवडून आले आहेत. त्यातील अनेक नगरसेवकांना सत्तेचा लाभ मिळालेला नाही. 2 वर्षे कालावधी पूर्ण झालेले भाजपमधून 4, तर राष्ट्रवादीतील 2 सदस्य आहेत. शिवसेनेने आपल्या सदस्याचा कालावधी एक वर्षच ठेवला आहे. काँगेसच्या वैशाली मराठे या सुद्धा समितीमधून बाहेर पडणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.