Pune : डोक्यात क्रेनचा हुक पडून कामगाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज – पथदिव्याचा खांब काढताना क्रेनचा हुक डोक्यात ( Pune) पडून कामगाराचा मृत्यू झाला आहे.या प्रकरणी समर्थ पोलिसांनी पाचजणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. नाना पेठेतील डोके तालीम चौकात 3 एप्रिल रोजी ही दुर्घटना घडली होती.

पांडुरंग अमृतराव म्हस्के (वय35 , सध्या रा. धनकवडी, मूळ रा. जालना) असे मृत्युमुखी पडलेल्या कामगाराचे नाव आहे. म्हस्के यांच्या मृत्यूस जबाबदार ठरल्याप्रकरणी रेवण तुळशीदास नाथ (वय28, रा. गाडीतळ हडपसर), फैय्याज इद्रीस अहमद उर्फ इम्तियाज (वय 24, रा. मंगळवार पेठ), सीमा जांभळे (वय 45 , रा. येरवडा), बाबू शिंदे (रा. धनकवडी), योगेश बबन म्हस्के (रा. शेवाळवाडी, हडपसर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस उपनिरीक्षक अक्षयकुमार गोरड यांनी समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Pune : टेम्पोने धडक दिल्याने चाकाखाली सापडून चिमुरड्याचा मृत्यु ; आई गंभीर जखमी

नाना पेठेतील डोके तालीम परिसरात पथदिव्याचा खांब काढण्याचे काम  3  एप्रिल रोजी चालू ( Pune) होते. हे काम ठेकेदाराकडे सोपविण्यात आले होते. इलेक्ट्रिशयन असलेले म्हस्के ठेकेदाराकडे कामाला होते. पथदिव्याचा खांब काढण्याचे काम जांभळे क्रेन सर्व्हिसकडे सोपवण्यात आले होते. हे काम पूर्ण झाल्यानंतर म्हस्के तेथे ठेवलेले साहित्य गोळा करत होते. त्यावेळी अचानक क्रेनचा लोखंडी हुक तुटून म्हस्के यांच्या डोक्यात पडला. म्हस्के यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्यांचा मृत्यू झाला.

क्रेनवरील चालक, तसेच मालकास क्रेनच्या हुकला जोडलेली लोखंडी तार झिजल्याचे माहित होते. कामाच्या ठिकाणी सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणतीही सुरक्षाविषयक साधने पुरवली नाहीत. म्हस्के काम करत असल्याचे माहित असताना त्याकडे दुर्लक्ष करून क्रेनचा हुक जोरात वर खेचला. त्यामुळे हुक तुटून म्हस्के यांच्या डोक्यात त्यांचा मृत्यू झाल्याचे तपासात ( Pune) उघडकीस आले. त्यानंतर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.