Pune : टेम्पोने धडक दिल्याने चाकाखाली सापडून चिमुरड्याचा मृत्यु ; आई गंभीर जखमी

एमपीसी न्यूज – अप्पर उताराच्या रस्त्यावर आई सोबत चाललेल्या चिमुरड्याला ( Pune)  टेम्पोने धडक दिल्याने चाकाखाली सापडून चिमुरड्याचा मृत्यु झाला तर त्याची आई गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी संध्याकाळी साडेसात च्या सुमारास अप्पर येथे घडली. अपघातानंतर टेम्पो चालक टेम्पो सोडून पळून गेला.

Today’s Horoscope 08 April 2024 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

रुद्र सचिन शिंदे  ( वय 4 वर्षे ) असे मृत मुलाचे नाव असून या मुलाची आई रुपाली शिंदे ( वय 28 रा. ,शिवतेज नगर, बिबवेवाडी ) गंभीर जखमी आहे. रुपाली या आपल्या लहान मुलगा रुद्र याला घेऊन अप्पर येथील उत्तराच्या रस्त्यावरून जात असताना रस्त्यावरून वळण घेणार्‍या टेम्पोची जोरदार धडक बसून अपघात झाला . यामध्ये रुद्र चा मृत्यु झाला तर रुपाली शिंदे गंभीर जखमी झाल्या .टेम्पोचालक अक्षय पवार ( वय 24 रा सुपर, बिबवेवाडी ) हा अपघातानंतर टेम्पो सोडून पळून गेला.
अक्षय पवार हा वेल्डिंग करणारा असून टेम्पोमालक विजय खुरंगुळे यांनी त्यांचा चारचाकी टेम्पो MH 12 VT 7743 दुरुस्तीसाठी अक्षय पवार याला दिला होता, पोलीसांनी टेम्पो ताब्यात घेतला असून अक्षय पवारचा शोध घेत ( Pune) आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.