Rahatani : भंगार व्यावसायिकाकडून खंडणी घेतल्या प्रकरणी तिघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज – एका भंगार व्यावसायीकाकडे खंडणी मागितल्या (Rahatani) प्रकऱणी वाकड पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हि घटना शुक्रवारी (दि.18) रहाटणी येथे घडली.

याप्रकरणी मो.रऊफ रहेमतुल्ला खान (वय 31 रा.रहाटणी) यांनी शुक्रवारी (दि.18) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून निलेश पाटील (वय 23), गणेश गुटाळ (वय 25), गणेश गर्दे (वय 24) यांच्यावर गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा भंगारचा व्यवसाय आहे. त्यांच्याकडे भंगार खरेदी करणाऱ्या कामगारांना आरोपींनी रस्त्यात आडवले. फिर्यादीला फोन करून बोलावून घेतले.

Mumbai : पहिला उद्योगरत्न पुरस्कार उद्योगपती रतन टाटा यांना प्रदान

यावेळी त्यांनी भंगारचा धंदा चालवायचा असेल तर प्रत्येक कामगारांमागे 1 हजार रुपये द्यावे (Rahatani) लागतील अशी मागणी केली. फिर्यादीने नकार दिला असता फिर्यादीला हाताने मारहाण केली व फिर्यादीच्या गुगल पे वरून चार कामगारांचे 4 हजार रुपये जबरदस्ती देण्यास भाग पाडले.

वाकड पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.