सोमवार, सप्टेंबर 26, 2022

Rahatani News: तापकीरनगरमधील पथदिवे बंद; नागरिकांना त्रास

एमपीसी न्यूज : रहाटणीतील साई मल्हार कॅालनी, तापकीरनगर मधील पथदिवे अनेक दिवसांपासून बंद आहेत. हा भाग दाट लोकवस्तीचा आहे. (Rahatani News) दिवे बंद असल्याने रात्री नागरिकांना ये-जा करताना त्रास होत आहे. त्यामुळे महापालिकेने तातडीने दिवे सुरु करावेत अशी मागणी काळेवाडी रहाटणी केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष विवेक तापकीर यांनी केली आहे.

याबाबत महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, तापकीरनगर मधील साई मल्हार कॅालनीतील पथदिवे अनेक दिवसांपासून बंद स्थितीमध्ये आहेत. हा रस्ता वर्दळीचा असून अनेक नागरिक या भागामध्ये वास्त्यवास आहेत. या भागात सतत रहदारी असते. या भागातील पथदिवे अनेक दिवसांपासून बंद स्थितीमध्ये आहेत.

Four generation flag hoisting: चार पिढ्यांनी केले तिरंग्याला अभिवादन!

या भागातून अनेक महिला, जेष्ठ नागरिक, विद्यार्थ्यांची ये-जा सुरू असते. बंद पथदिव्यामुळे नागरिक,महिला, विद्यार्थी जेष्ठ नागरिक यांना त्रास सहन करावा लागत आहे. (Rahatani News) त्यामुळे आपण  स्वतः लक्ष घालून कार्यवाही करावी. याबाबत संबंधित विभागास जाब विचारावा. दिवे सुरु करण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी निवेदनातून केली आहे.

spot_img
Latest news
Related news