Burglary News: ताथवडेत भर दिवसा दोन लाखांची घरफोडी

एमपीसी न्यूज : ताथवडे येथे चोरट्याने घरफोडी करून सोन्याचे दागिने, रोख रक्कम असा एक लाख 91 हजारांचा ऐवज चोरून नेला.(Burglary News) ही घटना सोमवारी (दि. 15) सकाळी अकरा ते दुपारी चार या कालावधीत घडली.

Rahatani News: तापकीरनगरमधील पथदिवे बंद; नागरिकांना त्रास

सुभाषकुमार मोतीलाल (वय 26, रा. ताथवडे) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(Burglary Nerws) पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे घर बंद असताना चोरट्याने त्यांच्या घरातून 82 हजार 500 रुपयांचे मंगळसूत्र, 55 हजारांची चेन, 27 हजार 500 रुपयांचे कर्णफुल, 26 हजार रोख रक्कम असा एकूण एक लाख 91 हजारांचा ऐवज चोरून नेला. वाकड पोलीस याप्रकरणी तपास करीत आहेत

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.