Raj Thackeray : लोक मला फुकट घालवत आहेत ; राज ठाकरेंनी व्यक्त केली खंत

एमपीसी न्यूज – लोक फुकट घालवत आहेत, अशी खंत राज ठाकरे यांनी व्यक्त केली. राज ठाकरे यांचा महाराष्ट्र दौरा सुरू आहे. आज औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी हे विधान केले.

राज ठाकरे म्हणाले, आजही नाशिकमध्ये मनसेने चांगले काम केले असे म्हटले जाते. असा विकास झाला नाही, असा उल्लेख केला जातो. इतर ठिकाणी रस्त्यापासून ते पाण्यापर्यंतचे प्रश्न आहेत. मात्र, निवडणुकीच्या वेळी मुख्य मुद्दे बाजूलाच राहतात. राजकारणी समाजाला बिघडवतो की, समाज राजकारण्यांना बिघडवतो. जोपर्यंत मतपेटीतून राग व्यक्त होणार नाही, तोपर्यंत कशाचाही अर्थ राहणार नाही. सध्या तरी मला लोक फुकट घालवत आहेत,’ अशी सल त्यांनी व्यक्त केली.

राज ठाकरे पुढे म्हणाले, ‘आपल्या देशातील 5 लाख व्यावसायिकांनी देश सोडला आहे. यावर चर्चा होत नाही. त्यांच्या उद्योग, व्यवसायावर असणाऱ्यांचे पुढे काय होणार. कोरोनामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. शाळेची फी भरायचे पैसे लोकांकडे नाहीत. मात्र, आपण आर्यन खान प्रकरण, सुशांत सिंग प्रकरण, अंबानी प्रकरणात गुंतून पडतो. मीडियाही मूळ मुद्दे सोडून भलतेच दाखवतो. यातून काहीही निष्पन्न होत नाही. कारण मूळ प्रश्न बाजूला पडतो. अंबानी यांच्या घराखाली वाझेंनी गाडी का ठेवली? या प्रश्नाचे उत्तर अजूनही मिळालेले नाही.

म्हाडा पेपर फुटी प्रकरणाबाबत राज ठाकरे म्हणाले, राज्यात पेपर फुटण्याची ही काही पहिली वेळ नाही. याआधीही अनेकदा पेपर फुटले आहेत. पेपर फोडणाऱ्यांवर कठोर कारवाई होत नाही. सरकार म्हणून वचक नाही तसंच पेपर फोडणारे फुटत नाहीत’ अशी प्रतिक्रिया राज ठाकरे यांनी यावेळी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.