pune news: ‘वन्यजीव सप्ताह’ मध्ये रांगोळी स्पर्धा व व्याख्यान

एमपीसी न्यूज – पुणे महानगरपालीकेचे राजीव गांधी प्राणीसंग्रहालय व वन्यजीव संशोधन केंद्र आणि इंद्रधनुष्य पर्यावरण केंद्र यांच्यावतीने ‘वन्यजीव सप्ताह’ आयोजित करण्यात आला असून याअंतर्गत सोमवार, ३ ऑक्टोबर रोजी रांगोळी स्पर्धा घेण्यात आली.
याप्रसंगी ‘भारतातील वन्यजीव’ या विषयावर श्रीमती अश्विनी यादव, एज्युकेशनल ऑफिसर, उद्यान विभाग यांनी व्याख्यान दिले.
Rangoli Competition and Lecture in 'Wildlife Week'
या स्पर्धांमध्ये आत्तापर्यंत पुणे मनपाच्या व खाजगी शाळा व महाविद्यालयातील ५०० हून अधिक विद्यार्थी व शिक्षकांनी आतापर्यंत सहभाग नोंदविला आहे.
पुणे महानगरपालीकेचे राजीव गांधी प्राणीसंग्रहालय व वन्यजीव संशोधन केंद्र आणि इंद्रधनुष्य पर्यावरण केंद्र यांच्यावतीने ‘वन्यजीव सप्ताह’ 1 ते 7 ऑक्टोबर पर्यंत विविध कार्यक्रमाचे आयोजन करून साजरा करण्यात येत आहे.

शनिवार, 1 ऑक्टोबर रोजी सकाळी दहा वाजता चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. विश्वजीत नाईक यांचे “पक्षी विविधता आणि कृत्रिम घरटी” या विषयावर व्याख्यान झाले.  2 ऑक्टोबर रोजी पक्षी निरीक्षण व स्वच्छता मोहीम घेण्यात आली. 3 ऑक्टोबर  रोजी सकाळी दहा वाजता रांगोळी स्पर्धा घेण्यात आली. तसेच दुपारी 2 वा. वृक्ष विविधता यावर डॉ. सचिन पुणेकर यांचे व्याख्यान झाले. 4 ऑक्टोबर रोजी सकाळी पथनाट्य स्पर्धा घेण्यात आली. तसेच दुपारी 2 वा. सुभोवतालीचा निसर्ग या विषयावर जयंत देशपांडे यांचे व्याख्यान झाले.
5 ऑक्टोबर रोजी रोजी वृक्षारोपण करण्यात येईल. 6 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वा. वक्तृत्व स्पर्धा घेण्यात येईल. तसेच दुपारी 2 वा. “सस्तन प्राण्यांची जैवविविधता” या विषयावर शेखर नानजकर यांचे व्याख्यान होईल. 7 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वा. “टाकाऊ पासून टिकाऊ”  स्पर्धा घेण्यात येईल. तसेच दुपारी दोन वाजता ” सरिश्रप प्राण्यांची जैवविविधता” या विषयावर अनिल खैरे यांचे व्याख्यान होईल.
यानंतर सप्ताहादरम्यान आयोजित केलेल्या विविध स्पर्धांच्या विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात येईल. तरी या कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.