Nigdi News : निगडीत उद्यापासून “रानजाई” महोत्सव

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने 26 वे फुले,फळे, भाजीपाला, बागा, वृक्षारोपण स्पर्धा व भव्य प्रदर्शन “रानजाई” महोत्सव रंग, गंध, सृजनाचा 10 ते 12 मार्च 2023 या कालावधीत महापौर निवासस्थान, निगडी प्राधिकरण येथे आयोजित केले आहे. (Nigdi News) आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या हस्ते उद्या शुक्रवारी सकाळी 11 वाजता प्रदर्शनाचे उदघाटन होणार असून दुपारी 12 वाजता शशांक कोवाल यांचा लाईव्ह बँड होणार आहे.

सायंकाळी 5 वाजता व्याख्याते प्रदीप त्रिपाठी यांचे व्याख्यान आयोजित केले असून, सायंकाळी 6 वाजता माझी वसुंधरा पर्यावरण संवादक सिने अभिनेत्री प्रार्थना बेहरे यांच्याशी संवाद साधला जाणार आहे. सायंकाळी 7 वाजता आर जे अक्षय प्रस्तुत मनोरंजनाच्या विविध खेळांचे आयोजन केले आहे.

IND vs AUS : ऑस्ट्रेलियाची शानदार सुरूवात

11 मार्च 2023 रोजी सायंकाळी 4 वाजता व्याख्याते रघुनाथ ढोले यांचे व्याख्यान आयोजित केले आहे. तर, सायंकाळी 5.30  वाजता कवी संमेलन ‘निसर्गाच्या कविता’, सायंकाळी 6.30 वाजता सिद्धांत कालमेघ यांचा लाईव्ह बँड, सायंकाळी 7.30 वाजता आर जे अक्षय यांच्या सोबत मनोरंजनाच्या विविध खेळांचे आयोजन केले आहे.

12 मार्च 2023 रोजी सायंकाळी 5 वाजता आर जे अक्षय यांच्या सोबत मनोरंजनाच्या विविध खेळांचे कार्यक्रम आणि त्यानंतर बक्षीस वितरण समारंभ आणि प्रदर्शनाचा समारोप (Nigdi News) होणार असल्याची माहिती उद्यान विभागाने दिली आहे. पिंपरी-चिंचवड मधील सर्व नागरिकांनी “रानजाई” महोत्सवात मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.