Khed Crime News : एकच कार दोघांना विकून केली सहा लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – एकच गाडी दोघांना विकून ग्राहकाची सहा लाख हजार रुपयांची फसवणूक केली आहे. हा प्रकार 22 जुलै ते 9 जानेवारी या कालावधीत खेड जवळील रासे गावी (Khed Crime News)घडली.

याप्रकरणी गणेश आबु मंगसे (वय 45 रा.रासे, खेड) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून सनी सुनील दाते (वय 33 रा.पाषाण) याच्या विरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Chinchwad News : चिंचवडगाव येथील पीएमपीएमएल बस स्थानकात चौकशी कक्षाचे उद्घाटन

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्याशी आरोपीने मारुती सुझुकी ब्रेझा VDI (एमएच 12 पी.एच.5554) या कारचा व्यवहार  केला.त्यानुसार फिर्यादी यांनी आरोपीला 6 लाख 20 हजार दिले व कार ताब्यात घेतली. मात्र ही गाडी आरोपीने दुसऱ्या एकालाही विकल्याचे समोर आले. आपली फसवणूक झाली आहे समजताच फिर्यादींनी चाकण पोलीस ठाण्यात तक्रार केली असून चाकण पोलीस पुढील तपास (Khed Crime News) करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.