Vadgaon Maval News : तळीये येथे झालेल्या दुर्घटनेमध्ये बचाव कार्य करणाऱ्या एनडीआरएफ मधील जवानांचा सत्कार

एमपीसी न्यूज – महाड येथील तळीये येथे नैसर्गिक आपत्ती दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेमध्ये बचाव कार्य करणाऱ्या मावळ तालुक्यातील सुदुंबरे येथील एनडीआरएफ मधील जवानांचा मावळ तालुका सरपंच परिषदेच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला.

सरपंच परिषदेचे अध्यक्ष सुनील भोंगाडे, माजी उपसरपंच बापूसाहेब दरेकर, इंदोरीचे माजी उपसरपंच दिलीप ढोरे, आशिष ढोरे, चेतन जाधव आदींनी सुदुंबरे येथील कॅम्पमध्ये जाऊन जवानांचा सत्कार केला.

कमांडर राजेश यावले यांच्या मार्गदर्शनाखाली संजीव कुमार अहमद, नितीन मोरे, अभय येवले, प्रल्हाद सिंग, बरमा गुरू, गणेश कुदळे, सुशील आसवले, सिद्धाप्पा केरूर, औदुंबर पहाटे, नीता अशोक कोंणडेकर, मंजू जिमानी, गोविंद अधिकारी, अनिल कुमार, नामदेव इंगळे, दुर्योधन साहू या 22 जवानांनी हे मिशन पार पाडले.

या जवानांनी आपल्या जिवाची पर्वा न करता मदतकार्य करून आपले कर्तव्य पार पाडले. त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याच्या हेतूने त्यांचा सन्मान केल्याचे भोंगाडे यांनी सांगितले.

कुठल्याही आपत्तीकाळात घटनेच्या वेळी कॅम्पजवळील असणाऱ्या गावातील तरुणांकडून काही अपेक्षा व मदत कार्यासाठी पुढे येऊन हातभार लावण्याची भावना कमांडर यावले यांनी व्यक्त केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.