River Projects : नदी सुधार व नदीकाठ सुधार प्रकल्पांच्या माहितीसाठी 16 मे रोजी नागरिकांचे चर्चासत्राचे आयोजन

एमपीसी न्यूज – नदी सुधार व नदीकाठ सुधार प्रकल्पांबाबत (River Projects) नागरिकांच्या अनेक शंका आहेत. शहरात राबविल्या जाणार्‍या अशा महत्त्वाच्या प्रकल्पांची माहिती सर्वसामान्य नागरिकांना नसल्याने शंका निर्माण होतात. जनजागृतीबाबत महापालिका फारसे प्रयत्न करत नसल्यानेच प्रकल्प पुर्ण झाल्यानंतर त्यातील त्रुटी समोर येत असल्याची अनेक उदाहरणे आहेत.

नदी सुधार व नदी काठ सुधार योजनेबाबत येत्या 16 मे रोजी आयएमए च्या सभागृहामध्ये चर्चासत्र आयोजित केले आहे. यावेळी महापालिकेचे अधिकारी देखिल उपस्थित राहाणार असून ते प्रकल्पांचे सादरीकरण करणार आहेत. नागरिकांना किमान प्रकल्प काय आहे, त्यांच्या शंकांचे निरसन करणे व त्यांच्या सूचनां जाणून घेणे हा चर्चासत्र आयोजित करण्यामागचा उद्देश आहे. या चर्चासत्राला नागरिकांनी मोठ्यासंख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन अॅड वंदना चव्हाण यांनी केले.

Pimpri News : दिव्यांग विद्यार्थांना उच्च शिक्षणासाठी आता 1 लाख रुपयांचे अर्थसहाय्य

त्यापूर्वी आम्ही आयएमएच्या (River Projects) सभागृहात चर्चासत्र घेतले आहे. तेथे पालिका प्रेझेन्टेशन करणार आहे. स्वयंसेवी संस्था आणि प्रामुख्याने नागरिक त्यांच्या शंका, सूचना व्यक्त करतील. किमान नागरिकांना प्रकल्प काय आहे, काय करायला हवे हे तरी नागिरकाच्या पर्यंत पोहोचेल असे आम्हाला वाटते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.