Bhosari : घरफोडी करून चोरट्याने दागिन्यांसह अमेरिकन डॉलर पळवले

एमपीसी न्यूज – अज्ञात चोरट्याने घरफोडी करून सोन्या-चांदीचे दागिने, गॅस आणि अमेरिकन डॉलर असा एकूण 94 हजार 300 रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला. हा प्रकार 22 जानेवारी रोजी सकाळी गवळी नगर भोसरी येथे उघडकीस आला. याप्रकरणी 1 फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कांचन छगनलाल नरेश बारापातरे (वय 38, गवळी नगर, भोसरी) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे घर 20 जानेवारी रोजी रात्री नऊ ते 22 जानेवारी सकाळी दहा या कालावधीत कुलूप लावून बंद होते. दरम्यान, अज्ञात चोरट्यांनी घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. घरातून 70 ग्रॅम सोन्याचे, 250 ग्रॅम चांदीचे दागिने, एक गॅस आणि अमेरिकन डॉलर असा एकूण 94 हजार 300 रुपयांचा ऐवज चोरून नेला. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.