Chakan Crime : दुचाकीला अडकवलेल्या पिशवीतील दीड लाखांची रोकड बारा मिनिटात केली लंपास

1

एमपीसी न्यूज – दुचाकीला अडकवलेल्या पिशवीतून एक लाख 45 हजार रुपयांची रोकड लंपास झाल्याची घटना पाईट येथे घडली. पिशवी दुचाकीला अडकवून दुचाकीस्वार एका दुकानात प्लास्टिक कागद घेण्यासाठी गेला असता बारा मिनिटात कागद घेऊन परत आल्यानंतर त्यांच्या पिशवीतील रोकड लंपास झाल्याचे उघडकीस आले. हा प्रकार मंगळवारी (दि. 15) दुपारी सव्वा एक वाजताच्या सुमारास पाईट येथे घडला.

विश्वास बबन राळे (वय 39, रा. कोये, ता. खेड) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राळे यांनी दोन हजार आणि 500 रुपये किमतीच्या नोटा असलेली एकूण एक लाख 45 हजार रुपयांची रोकड एका पिशवीत ठेवली. ती पिशवी त्यांनी त्यांच्या दुचाकीला (एम एच 14 / ई टी 0577) अडकवली. पाईट येथे ते एका दुकानात प्लास्टिक कागद खरेदी करण्यासाठी गेले. त्यावेळी पैशांची पिशवी त्यांच्या दुचाकीलाच अडकवलेली होती. दुकानातून कागद घेऊन येईपर्यंत अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या पिशवीतून रोकड लंपास केली. हा प्रकार केवळ 12 मिनिटात झाला आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.