Chinchwad : पिंपरी-चिंचवडला सेफ सिटी करण्यासाठी पोलिसांचे बळकटीकरण करणार – देवेंद्र फडणवीस

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड (chinchwad)  शहराला सेफ सिटी करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. त्यासाठी पोलिसांचे बळकटीकरण करण्यात येईल, असे मत उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.

 

पिंपरी-चिंचवड शहरातील विविध विकास कामांचे भूमिपूजन आणि उद्घाटन देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडले. त्यानंतर आयोजित कार्यक्रमात फडणवीस बोलत होते.

Pimpri : पिंपरी न्यायालयाच्या स्थलांतराचा मुहूर्त ठरला; बुधवारी होणार स्थलांतर समारंभ

देवेंद्र फडणवीस म्हणाले, “पिंपरी-चिंचवड (chinchwad) शहरासाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालय केले. आता पोलिसांचे बळकटीकरण करणे आवश्यक आहे. मनुष्यबळ आणि इतर प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केले जातील. आयुक्तालयासाठी नवीन इमारत केली जाणार असून अधिक अधिकारी देखील दिले जाणार आहेत.

 

पिंपरी-चिंचवड शहर हे शहर आहे आणि गाव देखील आहे. पिंपरी-चिंचवडला (chinchwad) सेफ सिटी करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. त्यासाठी अगोदर पोलिसांचे बळकटीकरण करणे आवश्यक आहे. या बळकटीकरणाला सुरुवात याच वर्षी होणार असल्याचेही फडणवीस यांनी सांगितले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.