Sangvi: महिलेच्या तोंडावर थुंकणारा गजाआड

एमपीसी न्यूज – दारात डस्टबीन पडल्याचा आवाज आल्याने घरातून बाहेर आलेल्या महिलेला तरूणाने शिवीगाळ करत धक्काबुक्की केली. तसेच कानाखाली मारत तोंडावर थुंकत धमकी दिली. हा प्रकार शुक्रवारी रात्री साडेदहाच्या सुमारास पिंपळेगुरव येथे घडला. याप्रकरणी आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.

सौरभ सुरेश कन्हेरे (रा. सिध्दी विनायक जिंजर, सोसायटी, पिंपळेगुरव) असे अटक केलेल्या तरूणाचे नाव आहे. त्याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी 49 वर्षीय महिलेने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व आरोपी शेजारी राहत आहेत. शुक्रवारी रात्री साडेदहाच्या सुमारास फिर्यादीच्या दारासमोर डस्टबीन पडल्याचा आवाज आला. यामुळे बाहेर आलेल्या फिर्यादी यांना आरोपी सौरभ याने शिवीगाळ करत धक्काबुक्की केली. तसेच कानाखाली चापट मारून तोंडावर थुंकला आणि धमकी दिली. सांगवी पोलीस तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.