Sangvi: वृक्षांच्या पुनर्रोपणाची परवानगी असताना मुळापासूनच केली कत्तल

एमपीसी न्यूज -जुनी सांगवी प्रभाग क्रमांक 32 मधील बँक आफ महाराष्ट्र ते माकण हॉस्पिटल चौका पर्यंत रस्त्याचे काँक्रेटीकरण करण्याच्या नावाखाली 20 ते 25 वर्षां पूर्वींच्या झाडांची कत्तल केली आहे. काही वृक्ष पूर्ण काढणे. तर, काही वृक्षांचे पुनर्रोपण, छाटणी करण्याची परवानगी असताना सर्व वृक्षांची पूर्ण मुळापासूनच कत्तल केल्याचा आरोप मनसेचे राजू साळवे यांनी केला आहे.

जुनी सांगवी प्रभाग क्रमांक 32 मधील बँक आफ महाराष्ट्र ते माकण हॉस्पिटल चौकापर्यंत रस्त्याचे काँक्रेटीकरण, सेवावाहिन्या बदलण्यात येणार आहेत. त्यामुळे कामाला अडथळे ठरणारे वृक्ष पूर्ण काढणे, पुनर्रोपण करण्याची परवनागी ह प्रभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी मागतिली होती.

त्यानुसार उद्यान विभागाने पाहणी करुन बकुळ दोन, रेनट्री एक, बहावा सहा, कडुनिम दोन आणि कांचन एक असे 12 वृक्ष पुर्ण काढण्याची परवानगी दिली. तर, उंबर तीन आणि पिंपळ एक अशा चार वृक्षांचे पुनर्रोपन करण्याची परवानगी दिली होती. प्रत्यक्षात मात्र सर्वंच झांडाची मुळापासूनच कत्तल केली आहे. बँक आफ महाराष्ट्र ते माकण हॉस्पिटल चौकापर्यंत रस्त्यादरम्यान एकही झाड शिल्लक ठेवले नाही. सर्व झाडांची कत्तल केल्याचा आरोप साळवे यांनी केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.