Vadgaon Maval : शिवसेना मावळ तालुक्याच्या वतीने आशिष शेलार यांचा निषेध; शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केले होते आक्षेपार्ह विधान

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबद्दल भाजपाचे माजी मंत्री आशिष शेलार यानी आक्षेपार्ह विधान करून एकेरी उल्लेख केल्याबद्दल त्याचा आज शिवसेना मावळ तालुक्याच्या वतीने कान्हे फाटा येथे निषेध करण्यात आला. यावेळी शेलार यांच्या पुतळ्याला चप्पल व लाथा मारून निषेध करुन शेलारांच्या विरोधात जोरदार घोषण देण्यात आल्या.

याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे, शिवसेना महिला आघाडी पुणे जिल्हा संघटक श्रीमती शादान राजूभाऊ चौधरी, शिवसेना तालुकाप्रमुख राजेश खांडभोर, शिवसेना मावळ तालुका संघटक सुरेश गायकवाड, माजी पंचायत समिती सभापती शरद हुलावळे, तालुका समन्वयक बाळासाहेब फाटक, सहसंघटक यशवंत तुर्डे, उपतालुका प्रमुख मदन शेडगे, अमित कुमार, चंद्रकांत भोते, युवासेना उपजिल्हा अध्यक्ष व उपसरपंच कान्हे ग्रामपंचायत गिरीश सातकर, युवासेना तालुका चिटणीस विशाल हुलावळे, भा.वि. सेना तालुका संघटक धनंजय नवघणे, नगरसेविका कल्पना आखाडे, आरोग्य समिती सभापती नगरसेविका सिंधुताई परदेशी, विभागप्रमुख जयदास ठाकर सुनील शिंदे, काळू हुलावळे, राम सावंत, योगेश काकरे, संघटक उमेश गावडे, विभाग प्रमूख उमेश दहीभाते, शहर प्रमूख कामशेट सतीश इंगवले, उपशहर प्रमुख मनेष पवार, शिवसेना प्रसिद्धीप्रमुख लोणावळा शहर विजय आखाडे, शिवसेना पवन मावळ प्रसिद्धीप्रमुख पोपट राक्षे , शिवसेना महिला आघाडी उपशहर संघटक प्रतिभाताई कालेकर, महिला विभाग संघटक शोभा चव्हाण, मोहन मल्ला, कमर अन्सारी, मोबीन इनामदार उपविभाग प्रमुख विलास अढुवळे, देहूरोड शहरातील शिवसेना नेते भरत नायडू, शिवसेना अवजड वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष हेमंत मेणे, अवजड वाहतूक सेना तालुका उपाध्यक्ष नरेश काळवीट, नितीन खांडभोर,संदीप पिंगळे, श्रीपत तुर्डे, सुन्नी मुस्लिम जमात लोणावळा व्हाईस चेअरमन रफिक शेख, ट्रस्टी अब्बास खान,अनिल सातकर, सामाजिक कार्यकर्ते जाकीर शेख व आजी-माजी पदाधिकारी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.