Sangvi : घरफोडी करून चोरट्यांनी दागिन्यांसह साड्यासह टीव्ही पळवला

एमपीसी न्यूज – घरफोडी करून घरातून सोन्याचे दागिने आणि साड्या तसेच टीव्ही पळवून नेला. हा प्रकार रविवारी (दि. 19) पहाटे एक ते सकाळी नऊ या कालावधीत पिंपळे गुरव येथे घडला.

प्रकाश नामदेव डेरे (वय 33, रा. पिंपळे गुरव) यांनी याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी ढेरे यांचे घर रविवारी पहाटे कुलूप लावून बंद होते. दरम्यान अज्ञात चोरट्यांनी दरवाजाचे कुलूप कापून घरात प्रवेश केला. घरातून एक लाख 16 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने साड्या आणि टीव्ही असे साहित्य चोरट्यांनी चोरून नेले. हा प्रकार रविवारी सकाळी नऊच्या सुमारास उघडकीस आला. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.