Chinchwad News : स्वच्छता कर्मचा-यांनी योगा आणि प्राणायाम करावा – अजय चारठणकर

एमपीसी न्यूज – सफाई कर्मचाऱ्यांनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. दैनंदिन जीवनात काम करत असताना स्वतःसाठी थोडा वेळ काढून योगा आणि (Chinchwad News) प्राणायाम केल्यास अनेक व्याधींपासून बचाव होण्यास मदत होते. तसेच शरीरासोबतच मनदेखील निरोगी राहते, असे मार्गदर्शन आरोग्य विभागाचे उपआयुक्त अजय चारठणकर यांनी केले.  

स्वच्छ सर्वेक्षण 2023 मध्ये पिंपरी-चिंचवड शहर देशात अव्वल स्थानावर येण्यासाठी महापालिकेच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याअनुषंगाने  महापालिकेच्या संबंधित अधिकारी, कर्मचारी व विभाग यांच्या कामकाजाचे स्वरुप व जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. याबद्दल सविस्तर माहिती देण्यासाठी दोन टप्प्यांत 4 ठिकाणी सफाई कर्मचाऱ्यांसाठी विशेष प्रशिक्षण सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहामध्ये अ आणि ब क्षेत्रीय कार्यालयातील सफाई कर्मचा-यांचे  प्रशिक्षण आज आयोजित करण्यात आले होते, त्यावेळी उपस्थित सफाई कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

यावेळी क्षेत्रीय अधिकारी सुचेता पानसरे, सोनम देशमुख, यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाचे डॉ. अतुल देसले, सहायक आरोग्य अधिकारी राजू साबळे, एम.एम.शिंदे, मुख्य आरोग्य निरीक्षक अंकुश झिटे, सुधीर वाघमारे, पतंजली योग समितीचे डॉ. अनिल जगताप, कॅम फाउंडेशनचे देवेंद्र शेंद्रे, बेसिक्स, डिव्हाईन या माध्यम संस्थेचे प्रतिनिधी तसेच सफाई कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Talegaon Dabhade : तळेगाव दाभाडे येथे अज्ञात चोरट्यांनी मंगळसूत्र चोरले

चारठाणकर म्हणाले, सफाई कर्मचारी सातत्याने साफसफाईचे काम करत  असल्यामुळे त्यांना अनेक व्याधी जडतात.  हे टाळण्यासाठी काम करताना योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. कामाएवढेच स्वतःचे आरोग्यही तितकेच महत्त्वाचे असून त्याबाबतची  योग्य खबरदारी घेणे गरजेचे आहे.(Chinchwad News) महापालिकेच्या सर्व सफाई कर्मचा-यांना शासकीय योजनांचा लाभ घेता यावा तसेच जास्तीत जास्त सफाई कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना ‘स्वाभिमान’ या उपक्रमाचा लाभ घेता यावा यासाठी महापालिका प्रयत्न करत आहे. तसेच सफाई कर्मचाऱ्यांच्या अडचणी आणि प्रश्न समजून घेऊन त्यावर काम करण्यासाठी महापालिका सातत्त्याने कार्यरत आहे, असे देखील ते म्हणाले.

दरम्यान, यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाचे डॉ. अतुल देसले यांनी उपस्थित सफाई कर्मचाऱ्यांना आरोग्यविषयक मार्गदर्शन केले. पतंजली योग समितीचे डॉ. अनिल जगताप यांनी योगा आणि प्राणायाम याबद्दल मार्गदर्शन केले. नोव्हेंबर 2022 मध्ये सर्वोत्तम कामगिरी करणा-या अ  आणि ब कार्यालयांतील  सफाई कर्मचाऱ्यांना उपआयुक अजय चारठाणकर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. (Chinchwad News) सफाई कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी मोफत रोजगारभिमुख शिक्षण आणि कोर्सेसबद्दल माहिती सिंबायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीच्या प्रियांका कापोरे यांनी यावेळी सांगीतली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पौर्णिमा भोर यांनी केले तर क्षेत्रीय अधिकारी सोनम देशमुख यांनी उपस्थितांचे आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.