SC reserves verdict on Rhea Chakraborty – सुशांतसिंह आत्महत्या प्रकरण सीबीआयकडे सोपवण्याच्या याचिकेला गुरुवारपर्यंत स्थगिती

Petition to hand over Sushant Singh's suicide case to CBI adjourned till Thursday

एमपीसी न्यूज – बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूतने 14 जून रोजी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यानंतर या प्रकरणाला वेगळेच वळण लागले. त्याच्या मृत्युच्या 45 दिवसांनंतर सुशांतच्या वडिलांनी बिहारमध्ये एफआयआर दाखल केली. त्यानंतर या प्रकरणाची सीबीआयतर्फे चौकशी करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. त्यावर रिया चक्रवर्तीच्या वतीने तिच्या वकिलांनी सर्वोच्च न्यायालयात दोन याचिका दाखल केल्या आहेत.

पहिल्या याचिकेनुसार या प्रकरणाची बिहारच्या ऐवजी मुंबईत चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच दुस-या याचिकेनुसार तिच्याविरुद्ध सुरु असलेल्या मीडिया ट्रायल थांबवल्या जाव्यात.

रिया चक्रवर्ती हिच्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली असून सर्वोच्च न्यायालयाने आपला निर्णय गुरुवारी जाहीर करणार असल्याचे सांगितले आहे.

वेळी सर्वोच्च न्यायालयात रियाच्या वतीने शाम दिवाण यांनी बाजू मांडली. तसेच अभिषेक मनू सिंघवी यांनी महाराष्ट्र सरकार, विकास सिंग यांनी के. के. सिंग(सुशांतचे वडील) आणि मनिंदरसिंग यांनी बिहार सरकारच्या वतीने युक्तिवाद केला.

_MPC_DIR_MPU_II

रियाने सुशांतचे वडील केके सिंग यांनी दाखल केलेला खटला पाटण्यातून मुंबईत हस्तांतरित करण्याची मागणी केली आहे. तसेच, बिहार, महाराष्ट्र, केंद्र सरकार आणि सुशांत सिंह राजपूतच्या वडिलांनी उपस्थित केलल्या प्रश्नांवर न्यायालय निकाल देईल.

सुशांतसिंहच्या वडिलांच्या तक्रारीवरुन बिहारमध्ये दाखल गुन्हा राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे अभिनेत्री रिया चक्रवर्तीने 14 पानांच्या शपथपत्रात म्हटले आहे.

रियाच्या याचिकेनुसार, बिहारमध्ये निवडणूक होणार असल्याने तिच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बिहारच्या लोकांचे भावनिक संबंध सुशांतसिंह राजपूतशी आहेत.

लोकांच्या भावनांचा वापर मतांसाठी करण्यासाठी राजकीय हेतूने बिहार सरकारने या प्रकरणात उडी घेतली आहे. आधी गुन्हा दाखल केला व नंतर सीबीआय चौकशीची शिफारस केली. ती करण्याचा अधिकार बिहार सरकारला नव्हता.

अभिनेता आशुतोष भाकरे आणि समीर शर्मा यांनीही आत्महत्या केली, पण या दोन्ही प्रकरणांबाबत माध्यमांमध्ये काहीच चर्चा रंगली नाही, असा दावाही रियाने केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.