Pimpri News : सुरक्षा रक्षकाचे अल्पवयीन मुलीसोबत गैरवर्तन

एमपीसी न्यूज – सोसायटीमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीने 17 वर्षीय मुलीसोबत गैरवर्तन करत तिचा विनयभंग केला. (Pimpri News) त्यांनतर स्वतःच आरडाओरडा करून लोकांना जमा केले. जमा झालेल्या लोकांनी देखील मुलीशी हुज्जत घातली. हा प्रकार 2 फेब्रुवारी रोजी रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास पिंपरी येथे घडला.

उमेश (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) आणि सोसायटी मधील 30 ते 40 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पीडित 17 वर्षीय मुलीने सोमवारी (दि. 6) पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Pimpri News : नवजात बालकांच्या अतिदक्षतेसाठी नूतन भोसरी रूग्णालयात बेबी वाॅर्मर लोकार्पण सोहळा संपन्न

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मुलगी आणि तिचा भाऊ घरी असताना आरोपी सुरक्षा रक्षकाने मुलीसोबत गैरवर्तन केले. तसेच तिच्या चारित्र्याबद्दल अपशब्द बोलून तिचा विनयभंग केला. सुरक्षा रक्षकाने आरडाओरडा करून सोसायटी मधील लोकांना बोलावून घेतले. (Pimpri News) सोसायटी मधील 30 ते 40 लोकांनी मुलीसोबत हुज्जत घालून तिच्याशी भांडण केले. याप्रकरणी विनयभंग, मारहाण, दमदाटी आणि बाललैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.